देणगीमुळे झालेले चांगले परिणाम
समाजात विज्ञान प्रसार, प्रचाराचे काम मोठ्या जोमाने पुढे नेण्यासाठी परिषदेची आज स्वतःची विज्ञान भवन ही ६२४ चौ.मी.ची मुंबईत एक मजली वास्तू आहे. दानशूर व्यक्तींच्या देणगींमुळे विज्ञानतंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींस १५+ विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. महाराष्ट्रात ग्रामीण पातळीवरील शाळांमध्ये शनिवारी विज्ञानवारी उपक्रमात कृतीसत्रांच्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वर्षभर विज्ञान समजावून सांगितले जाते. हे सारे देणगींमुळेच संभव आहे.
मराठी विज्ञान परिषद खालील उद्देश साध्य करू पहाते
तुम्ही दिलेल्या देणगीचा वापर
कोणत्याही सामाजिक, अशासकीय आणि ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेला मिळणाऱ्या देणगींवर तिच्या कार्याची व्याप्ती ठरते, तिच्याकडे असणाऱ्या संसाधनांची परिणामकारकता ठरते आणि तिच्या कार्यातून कार्यकर्त्यांची फौज निर्माण होते. दैनंदिन कामकाजासाठी राखीव निधी, विविध विज्ञान उपक्रमांसाठी प्रकल्प निधी, विशेष उपक्रमांसाठी इतर निधी आणि विज्ञानभवनाच्या विस्तारासाठी इमारत निधी; असे विविध देणगीचे प्रकार आहेत.
देणगी विनियोगासाठी परिषदेकडे सुमारे ७५+ उपक्रम आहेत. विज्ञानात उच्चशिक्षण घेणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ति तसेच विज्ञान संशोधन, लघुउद्योजक, अभियांत्रिकी संशोधन, विज्ञान - तंत्रज्ञान, कृषि विज्ञान असे विविध पुरस्कार परिषद देत असते. याबरोबरच विज्ञान एकांकिका, विज्ञान रंजन कथा, विज्ञान निबंध अशा विविध स्पर्धाही घेतल्या जातात. समाजोपयोगी तंत्रज्ञान निर्मितीसाठी पीएच्.डी. विद्यार्थ्यांमार्फत संशोधन प्रकल्प राबविले जातात.
सर्वसाधारण वर्गासाठी विविध व्याख्याने, प्रकाशने, प्रशिक्षण वर्ग यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी जवळपास ३०+ उपक्रम राबविले जातात. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेलमधून आजवर ३९ पुस्तके प्रकाशीत केली आहेत. विज्ञानमेळा, प्रयोग शिबीरे, विज्ञान अनुभूती, आनंददायी विज्ञान, विज्ञानखेळणी, बालवैज्ञानिक संमेलने, वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परिक्षा, पौगंडावस्थेतील मुलामुलींस लैंगिक शिक्षण असे अनेक कार्यक्रम केले जातात. या सर्वांसाठी संसाधनांची निर्मितीदेखिल आवश्यक असते; परिषद या साऱ्या गोष्टी करीत असते.
मराठी विज्ञान परिषदेचे योगदान
आतापर्यंत १५,००,००० विद्यार्थ्यांना मदत झाली आहे.
खालील मान्यवरांचे योगदान आणि आशीर्वादामुळे हे शक्य झाले...